जागर न्यूज : कुत्रा चालल्याने आधीच एक बळी गेला असताना आता पुन्हा दुसराही बळी गेल्याचे चिंता व्यक्त होऊ लागली असून एकूण बारा जणांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे.
कुत्रा चावणे ही तशी सामान्य बाब मानली जाते, कुत्रा चावल्यावर कुणी रुग्णालयात जाते तर कुणी घरगुती औषधे वापरतात. कुणी कुणी तर कुत्रा चावला म्हणून याकडे दुर्लक्षही करतात पण कुत्रा चावणे हे देखील जीवघेणे असल्याचे आणखी एकदा समोर आले आहेत. मंगळवेढा येथे तर कुत्र्याचा धसकाच घेतला गेला आहे. पिसाळलेले कुत्रे चावले आणि इतरांनाही धडकी भरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या काझी गल्ल्ली परिसरातील मोहम्मद हिरालाल बेदरे यांचा अखेर दोन महिन्यांनी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्यांचे बंधू इब्राहिम हिरालाल बेदरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे पश्चात्य दोन मुले व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
अडीच महिन्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने एका शनिवार पेठ , जगदाळे गल्ली , माने गल्ली , बोराळे नाका, सराफ गल्ली येथील सुमारे १२ जणांना चावा घेतला आहे. चावा घेतलेल्यांना मंगळवेढा व सोलापूर येथील खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी मोहम्मद हिरालाल बेदरे यांनाही हे कुत्रे चावल्यामुळे सोलापूर येथील रूग्णालयात उपचार होते. उपचारादरम्यानच सुरू रविवार दिनांक १४ मे रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर दहा दिवसांनी त्यांचे बंधू इब्राहिम हिरालाल बेदरे यांचाही मृत्यू झाला आहे.
कुत्रा चावणे हे जीवावर बेतू शकते हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले असून प्रशासनाने देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक ठरू लागले आहे. (Another death due to dog bite, citizens worried) मंगळवेढा शहरातील मोकाट व बेवारस कुत्र्याला लगाम घालण्यात संबंधित शासकीय अधिकारी अपयशी ठरला असून तो चावलेल्या कुत्र्याच्या हल्यातील हा दुसरा बळी असुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. कुत्र्याच्या चावण्याचे दोघांचे बळी गेल्यामुळे अनेकांना धडकी भरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा