जागर न्यूज : कामचुकार सरकारी डॉक्टरची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीच हा आवाज उठवला आहे. या एका फलकाची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे.
शासकीय अधिकारी हे मनमानी करण्याबाबत प्रसिद्ध असतातच पण अनेक अधिकारी हे कामचुकारपणा करण्यात धन्यता मानताना दिसतात. विशेष म्हणजे आरोग्य व्यवस्थेत देखील असे प्रकार घडतात आणि डॉक्टर रुग्णालयात उपस्थित रहात नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असते. रुग्णांनी कितीही ओरड केली तरी त्यांच्यात फरक पडताना दिसत नाही. मंगळवेढा येथील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मात्र आपल्या खास स्टाईल ने एका डॉक्टरला इंगा दाखवला असून याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक अरविंद गिराम वारंवार गैरहजर राहिल्यामुळे आरोग्य सुविधा मिळण्यासाठी झालेल्या अडचणी व अस्वच्छतेवरून भाजपाचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क डिजिटल फलकावरून आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा कारखानदारीच्या निमित्ताने मंगळवेढ्याशी संबंध असताना त्यांनी तालुक्यामध्ये आरोग्य व्यवस्था निष्क्रिय होत असल्याचे समोर आल्याने लक्ष घालण्याची गरज आहे.वाढत्या रुग्णाचा विचार करुन आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनास दाखल केलेला वाढीव बेडचा प्रस्ताव देखील शासन दरबारी प्रलंबित आहे, (Government health system exposed by ex-ministers) कर्मचार्यांच्या गैरहजेरीमुळे आरोग्य उपचारासाठी आलेल्या रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे रूग्णाची परिस्थिती खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील महिन्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याने आरोग्य खात्याचा कारभारावरून कान उघडणी केली. असता त्या पदाधिकार्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता वैद्यकीय उपचारात विलंब केल्यामुळे रुग्णांचा व नातेवाईकांचा रोष वाढतो हे वाढण्यापूर्वी कर्मचार्यांनी आपले कर्तव्य बजावताना वैद्यकीय सुविधा चांगली देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून वैद्यकीय कर्मचारी हे रुग्णांना देवासारखे वाटले पाहिजेत अशी सुविधा मिळणे अपेक्षित आहे मात्र त्यामध्ये टाळाटाळ केल्यामुळे त्याची परिणीती डिजिटल फलकावर लावण्यात झाली. त्या ग्रामीण रुग्णालयात शिपायाची सात पैकी चार पदे रिक्त आहेत त्यामुळे रिक्त पदे भरण्याबरोबर आरोग्य विभागाच्या रखडलेल्या प्रश्नावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत व आ.समाधान आवताडे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा