जागर न्यूज : बंदी असलेला गुटखा पुन्हा एकदा मंगळवेढा पोलिसांनी पकडला असून लाखो रुपयांच्या गुताख्यासह एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
कर्नाटकातून आलेल्या विविध कंपन्याच्या ३१ लाख ८०० रु गुटक्यासह ४२ लाख ८ रु ऐवज हस्तगत करण्यात आला याप्रकरणी पोलीसांनी चार जनावर गुन्हा दाखल केला गुटक्यावर पोलीसाकडून वारंवार कारवाई होवून देखील गुटक्याची तस्करी सुरुच आहेकर्नाटक राज्यातील निपानी येथून मालवाहतुक ट्रकमधून सोलापूरला गुटखा जाणार असल्याची खबर पोलीसांना लागताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सांगोला नाका येथे सापळा लावला असता, मालट्रक क्र एम एच १२ एच.डी. ७८७६ हे वाहन या सापळ्यात अडकले. सदर वाहन आल्यानंतर सशंयीत चालकाकडे चौकशी करण्यात आली. .सदर माल वाहतुक गाडीत पाठीमागील बाजुस ताडपत्री बांधलेली सोडुन बॅटरीचे उजेडात पाहीले असता पाटीमागील बाजुस पांढरे रंगाची पोती दिसत होती. सदर पोत्यात काय आहे याबाबत चालक राजु चंद्रकांत व्होनमाने (वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर) याच्याकडे विचारणा केली असता गाडीत गुटखा असल्याचे समजले
पांढरे रंगाचे पोत्यात पानमसाला गुटखा व सुगंधी तंबाखु आहे. असे त्याने सांगीतल्याने पोलिसांनी सदर ट्रक चालकास घेवुन मंगळवेढा पोलीस ठाणेस आणुन ट्रक मधील पोती बाहेर काढुन पाहिले असता त्यामध्ये हिरा पानमसाला पिवळा १२० रु.ची १२३४२ पाकिटे कि १४ लाख ८१ हजार ४० रु,रॉयल ७१७ सुगंधी ३० रु किंमतीची २०४०० पाकिटे कि.६ लाख १२ हजार,हिरा पानमसाला गुलाबी १३० रु किंमतीची ५२०२ पाकिटे कि. ६ लाख ७६ हजार २६० रु,रॉयल ७१७ सुगंधी तंबाखु ६५ रु किंमतीची ५१०० पाकिटे कि.३ लाख ३१ हजार ५०० रु निळा ट्रक नंबर एम एच १२ १ एच.डी. ७८७६ वाहन कि.११ लाख असा ४२ लाख ८०० रु चा ऐवज हस्तगत करण्यात आला.
सदर वाहन चालकाकडे वाहन मालका बाबत चौकशी केली असता वाहन मालक हा सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर व वाहतुकदार जबीउल्ला सयद उर्फ रोशन यांच्या मार्फत निपाणी, कर्नाटक येथुन करीत असल्याबाबत सांगीतले.वरील वर्णनाचा व किंमतीचा गुटखाजन्य माल व वाहनाचा पंचनामा करण्यात आला. (Banned gutkha caught by rural police in Solapur district) राजु चंद्रकांत व्होनमाने वय ५८ वर्षे रा. साधेपुर ता. दक्षिण सोलापुर ,सोमनाथ पुजारी रा. मंद्रुप ,जबीउल्ला सयद उर्फ रोशन,रफिक उर्फ रसुल मेनन रा. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांचे विरूध्द मंगळवेढा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ येलपले हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा