जागर न्यूज : पंढरीच्या चंद्रभागेत बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा अखेर आज मृतदेह आढळला असून काल दुपारपासून त्याचा शोध घेण्यात येत होता.
बोटीच्या मदतीने त्याचा शोध घेत असताना आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या हाती २१ तासांनी अर्थात गुरुवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह मिळाला. राजसिंह रणजीतसिंह सरदार (वय २२, रा. सांगोला) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. चंद्रभागा नदीपात्रात स्नान करताना सांगोला येथील २२ वर्षीय युवक बुडाला आणि पाण्यात वाहून गेल्याची धकादायक घटना काल बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. राजसिंह रणजितसिंह सरदार (वव २२, रा. सांगोला) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. राजसिंह हा युवक आपल्या व्यवसायानिमित्त पंढरपूर येथे कुटुंबासह आलेला होता. खुरपे, विळे, कुदळ अशा लोखंडी वस्तू विकण्याचा त्याच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सरदार कुटूंबीय चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. सध्या उजनी धरणातून ६ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने येथील नदीचे पात्र भरून वाहत आहे.
जुन्या दगडी पुलाच्या वरील बाजुस नवीन बंधाऱ्याजवळ या पाण्याला अधिक वेग आहे. या ठिकाणी सर्वजण स्नान करीत असताना अचानक राजसिंह हा पाण्यात बुडाला. काही क्षणातच तो दिसेनासा झाल्याने सरदार कुटूंबियांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे स्नानासाठी आलेले इतर भाविक तसेच स्थानिक होडी चालक नागरिकांनी तात्काळ नदीपात्रात सर्वत्र शोधमोहीम सुरू केली, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दाखल झाले. या पथकाने स्पीड बोटीच्या सहाय्याने राजसिंह याचा परिसरातील नदीपात्रात सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता.
स्पीड बोटीच्या साहाय्याने राजसिंहचा शोध कालपासून सुरू होता. मोठी शोधाशोध केल्यानंतर अखेर तब्बल ३१ तासांनी या तरुणाचा मृतदेह चंद्रभागेच्या पात्रात आढळून आला असून या घटनेने चिंता अधिक वाढवली आहे.(The body of the youth who drowned in Chandrabhaga was finally found) चैत्र यात्रा सुरु होत असून भाविक चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी जात असतात त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा