जागर न्यूज : महिलेच्या घरात घुसून विनयभंग करणाऱ्या आणि तिच्या पाटीवर कोयत्याने वार करून जखमी करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील एकाला न्यायालयाने दोषी धरले असून या गुन्ह्यात त्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे ही घटना घडली होती. शहाजी भीमराव गायकवाड याने पिडीत महिलेच्या घरात घुसून महिलेचा विनयभंग केला होता तर अचानक आलेल्या पतीने विरोध करताना पतीला शिवीगाळ करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. याप्रकरणी शहाजी गायकवाड याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. जे कुंभार यांच्यासमोर झाली आणि समोर आलेले पुरावे आणि साक्षीदार यांच्या साक्षी विचारात घेवून गायकवाड याला दोषी धरण्यात आले आणि सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पिडीत फिर्यादी ही घरात असताना शहाजी गायकवाड हा तेथे गेले व तिचा विनयभंग केला. यादरम्यान, त्या महिलेचा पती तेथे आला असता त्याला आरोपीने शिवीगाळी, दमदाटी करत हातातील ऊस तोडणीच्या कोयत्याने डाव्या हातावर व उजव्या पायावर मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस हवालदार बी. के. मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी वकील एम.एम. पठाण यांनी सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासले. समोर आलेल्या सर्व बाबींचे अवलोकन करून व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने (Forced labor to accused in Pandharpur taluka in molestation case) आरोपी शहाजी गायकवाड याला भा. दं. वि. कलम ३२६ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, कलम ३५४ मध्ये ६ महिने सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, कलम ३५४ अ मध्ये ३ महिने सश्रम कारावास व ४५२ मध्ये ३ महिने साधी कैद व ५०० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा