शोध न्यूज : महाराष्ट्र थंडीने गारठला असतानाच थंडीचा कडका आणखी वाढणार असून राज्यतील १३ जिल्ह्यात तापमान एकदम घटले असल्याने थंडीचा प्रकोप राज्यात सुरु असून तो आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे.
राज्यात थंडीचा कडका सुरु आहे. सर्वात हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील तपमान सर्वाधिक घसरले आहे. काश्मिरामध्ये सुरु असलेली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवातामुळे तापमान घसरले आहे. राज्यातील १९ शहरांतील किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून तीन चार दिवस थंडीच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यासह देशात थंडीचा प्रकोप सुरु आहे.
राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.७ अंश सेल्सियस होते. त्यानंतर निफाडचा क्रमांक आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ अंशावर आले आहे.
सोमवारी ९ जानेवारी महाराष्ट्रातील सुमारे १३ जिल्ह्यांतील किमान तापमानात ५ ते ६ अंशांची घट झालीय. राज्यात तापमानाचा नीचांक नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये नोंदवला गेला. ओझरचे तापमान ४.७ अंश सेल्सियस होते. त्यानंतर निफाडचा क्रमांक आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या जळगाव, धुळ्याचे तापमान ५ अंशावर आले आहे. औरंगाबाद ५.७ अंश, उस्मानाबादचे तापमान ९ अंश सेल्सिय नोंदवण्यात आलेय. नाशिकमध्ये सकाळी नऊपर्यंत दाट धुक्याची चादर दिसून येतंय.
तापमान आणखी घसरणार पुढील ४८ तास म्हणजे मंगळवार व बुधवारीही किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात १९ जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. (Cold weather will increase in the state in the next few days) त्यामुळे पुढील काही दिवस हे गारठवणारे असणार आहेत. थंडीपासून बचाव करण्याची अत्यावश्य गरज असून कडाक्याच्या थंडीने हृदयविकाराचा झटका येवू शकतो असे तज्ञांनी आधीच सांगितले आहे. वाढलेल्या थंडीत हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूत वाढ झालेलीही आढळून येवू लागली आहे.
थंडीची लाट वाढल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली जात आहे. प्रशांत कनोजिया यांनी प्रशासनाला पत्राद्वारे ही विनंती केली होती. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना परिस्थिती तपासून आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. थंडीचा कडाका असल्याने लहान मुलांना सर्दी, खोकला अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशात मुलांच्या तब्येतीकडे पाहून शाळेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा