जागर न्यूज : नव्या वर्षात व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांना जोरदार झटका बसणार असून अनेक मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही त्यामुळे अनेकांची कुचंबणा होणार आहे
व्हॉट्सॲप हे आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन जबरदस्त फीचर्स आणत असते. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या वर्षात आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप अनेक फीचर्स घेऊन येणार आहे. व्हॉट्सॲप हे अलीकडे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला असून सातत्याने हे एप वापरले जात असते. काही काळ बंद असले अथवा बिघाड झाला तर बेचैनी वाढू लागते एवढे ते आवश्यक बनले आहे पण आता अनेक स्मार्ट फोनमध्ये ते चालणारच नाही त्यामुळे एक तर त्याचा वापर विसरावा लागेल किंवा मग आपला मोबाईल बदलावा लागणार आहे.
व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांना एक झटका देणारी बातमी आहे. कारण काही वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाही. याबाबत एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुमचा तर समावेश नाही ना? पहा, याबाबत एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अहवालानुसार, या यादीमध्ये काही वर्षांपूर्वीच्या Apple, Samsung ते Huawei आणि इतर ब्रँडच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
- ॲपल आयफोन 5
- ॲपल आयफोन 5c
- अर्कोस 53
- प्लॅटिनम
- HTC Desire 500
- Huawei Ascend D
- Huawei Ascend D1
- Huawei AscendD2
- Huawei Ascend G740
- Huawei Ascend Mate
- Huawei Ascend P1
- क्वाड xl
- Lenovo A820
- एलजी एनक्ट
- एलजी ल्युसिड 2
- एलजी ऑप्टिमस F3
- एलजी ऑप्टिमस F3Q
- एलजी ऑप्टिमस F5
- एलजी ऑप्टिमस F6
- एलजी ऑप्टिमस F7
- एलजी ऑप्टिमस L2 II
- एलजी ऑप्टिमस L3 II
- एलजी ऑप्टिमस L5
- एलजी ऑप्टिमस L7
- एलजी ऑप्टिमस L4 II
- एलजी ऑप्टिमस L5 II
- एलजी ऑप्टिमस L7 II
- विको सिंक फाइव
- मेमो ZTE V956
- सॅमसंग गॅलेक्सी Ace 2
- सॅमसंग गॅलेक्सी कोर
- सॅमसंग गॅलेक्सी s2
- सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II
- सोनी एक्सपीरिया मिरो
- ग्रँड एस फ्लेक्स ZTE
- Grand X Quad V987 ZTE
- Vico Darknight ZT
- एलजी ऑप्टिमस 4X HD
- एलजी ऑप्टिमस L4 II Dual
- एलजी ऑप्टिमस L5 Dual
- सॅमसंग गॅलेक्सी s3 Mini
- LG Optimus L3 II Dual
- सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट
- सॅमसंग गॅलेक्सी एक्सकव्हर 2
- सोनी एक्सपीरिया आर्क्स
- सोनी एक्सपीरिया निओ एल
- एलजी ऑप्टिमस नायट्रो एचडी
- एलजी ऑप्टिमस L7 II Dual
सध्या व्हॉट्सॲप एका फीचरवर काम करत आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, आगामी स्टेटस अपडेट फीचर वापरकर्त्यांना स्टेटस विभागातील नवीन मेनूमध्ये स्टेटस अपडेट्सची तक्रार करण्याची परवानगी देईल. (WhatsApp users hit hard in the new year) त्यामुळे मोबाईल वापरकर्त्याने आपला फोन या यादीत आहे का ते आत्ताच तपासून घेणे श्रेयस्कर ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा