जागर न्यूज : कोरोनाबाबत टेंशन वाढवणारी बातमी आली असून विदेशातून भारतात परतलेले 39 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानांतून परतलेले हे प्रवासी आहेत. दरम्यान विदेशातून आलेला एक प्रवासी पुणे विमानतळावर कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.
देशातल्या सर्व विमानतळांवर 24 डिसेंबरपासूनच विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट केली जात आहे. एकूण 498 विमानांतून परतलेल्या 3 हजार 994 लोकांची टेस्ट करण्यात आली. ज्यात 39 प्रवाशी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांचे नमुने जीमोन सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आलेत. चीनमध्ये Omicron च्या BF.7 व्हेरिएंटची झपाट्याने वाढणारी प्रकरणे पाहता, भारतातील लोकांची चिंता वाढली आहे. लोकांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची आणि पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती आहे. मात्र, या प्रकाराचा धोका भारतीयांना भेडसावणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, नॅशनल हेल्थ कमिशनने सोमवारी जाहीर केले की चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता भारत सरकारने सतर्कतेच्या मार्गावर येऊन लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी, सरकारने भारत बायोटेकच्या नाकातील लस लसीकरण कार्यक्रमात बूस्टर डोस म्हणून समाविष्ट केली आहे. यासोबतच सरकारने त्याचे दरही निश्चित केले आहेत.
- परदेशात रुग्ण वाढत असले तरी, मुंबई व पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे खूपच कमी रुग्ण आहेत. १५ दिवसांत सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दोघेही बरे झाले असून मागील दहा दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नसून सध्या सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त आहे.
भारत बायोटेकच्या नाकातील लसची किंमत 800 रुपये + 5 टक्के जीएसटी असेल. तथापि, रुग्णालये यामध्ये स्वतःचे शुल्क जोडू शकतात. सरकारने अनुनासिक लसीची किंमत निश्चित केली असून त्याला बूस्टर डोस म्हणून मान्यता दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, सरकारी केंद्रांवर लसीची किंमत 325 रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु सध्या ही लस केवळ खाजगी केंद्रांवरच उपलब्ध असेल. कंपनीला खाजगी केंद्रांवर या लसीची किंमत 1200 रुपये ठेवायची होती. या लसीचे वैज्ञानिक नाव BBV154 आहे आणि भारत बायोटेकने तिचे नाव iNCOVACC ठेवले आहे.
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 157 नवीन रुग्ण आढळले आहेत. आज 27 डिसेंबर रोजी देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 157 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गाची 3421 सक्रिय रुग्णसंख्या आहे. (Travelers who came to India from abroad are corona positive) मागील दिवसाच्या तुलनेत केसेस कमी आहेत. 26 डिसेंबर रोजी 196 नवीन प्रकरणांची नोंद झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा