जागर न्यूज : विवाह झालेल्या दांपत्यांसाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती मात्र अनेकांना नसते. दरमहा १८ हजाराहून अधिक रक्कम मिळणारी योजना देखील सद्या कार्यान्वित आहे.
केंद्र शासन सर्व घटकांचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असते. विविध शासकीय योजनांच्या बाबत बहुतेकांना महिती नसते त्यामुळे या योजना संबंधितापर्यंत पोहोचत नाहीत. विवाहित जोडप्यांसाठी देखील योजना राबवण्यात येत असून एका योजनेमधून सरकार दर महिन्याला रक्कम देत असते. पी एम वय वंदन योजना (प्रधानमंत्री वय वंदना योजना) असे या योजनेचे नाव असून त्याची माहिती आम्ही देत आहोत. या योजनेत तुम्हाला वृद्धापकाळात दर महिन्याला पैसे मिळतील. ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्ही या सरकारी योजनेचालाभ घेऊ शकता.
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला मासिक पैसे मिळू शकतात. यामध्ये पती-पत्नीला महिन्याला 18500 रुपये मिळतात. विशेष म्हणजे यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि 10 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह परत मिळतात.जर या योजनेत कोणत्याही पती-पत्नीने प्रत्येकी 15 लाखांची गुंतवणूक केली, म्हणजे एकूण 30 लाखांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.40% दराने व्याजाचा लाभ मिळेल. या रकमेवर तुम्हाला व्याजातून 2,22000 रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. जर ही व्याजाची रक्कम 12 महिन्यांत विभागली गेली तर तुम्हाला दरमहा 18500 रुपये मिळतील आणि ही रक्कम तुमच्या खात्यात पेन्शन म्हणून येईल.
योजनेत जर फक्त एका व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांची गुंतवणूक करू शकता, ज्यावर तुम्हाला वार्षिक 111000 रुपये व्याज म्हणून मिळतील, म्हणजेच दरमहा 9250 रुपये तुमच्या खात्यात येतील.या योजनेचा परिपक्वता कालावधी 10 वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही 10 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. (Married people get monthly 'pension' from central government) जर तुम्ही त्यात 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे 10 वर्षांनंतर परत मिळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा