जागर न्यूज : प्रशासनाची बेफिकिरी पुन्हा एकदा समोर आली असून उपोषणाला बसलेल्या एका व्यक्तीचा जिल्हाधिकारी यांच्या दारातच थंडीने मृत्यू झाल्याची मोठी घटना समोर आली आहे.
दोन दिवसांपासून थंडीत कुडकुडत उपोषणा बसलेल्या पवार यांच्या मागणीकडे वेळ देण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या दारात आपला जीव सोडला. पण त्यांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला पाझर फुटलं नाही. पवार यांचा मृतदेह दोन ते तीन तास उपोषण स्थळीच होता. ना तिथे पोलीस आले, ना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर किंवा जिल्हा प्रशासनातील अधिकारी आले. (Death of hunger strikers at the doorstep of the Collector) तब्बल तीन तासांनी त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यामुळे प्रशासन किती कठोर काळजाचा असू शकतो याचा हा उदाहरण म्हणावे लागेल.
प्रशासन जबाबदार..
घरकुल योजनेचे थकलेले हप्ते मिळत नसल्याने पवार यांनी अनेक कार्यालयाच्या खेट्या मारल्या. अधिकाऱ्यांकडे विनवणी केली, पण त्यांच्या मागणीकडे कोणीच लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले होते. पण त्यानंतर देखील त्यांच्या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय. तर पवारांच्या मृत्यूला जिल्हा प्रशासनचं जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा