कौतुकास्पद !
जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गाव आणि उपनगरी भागात महाविद्यालयीन विद्यार्थी श्रमसंस्कार शिबिरांतर्गत स्वच्छता मोहिम राबविणार असून मोठ्या उत्साहात या शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे.
पंढरपूर येथील न्यु सातारा समुह मुंबई संचालित,न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए. च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिराचे लक्ष्मी-टाकळी येथे उद्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेमहाराज याच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.व सौ.विजयमाला सचिन वाळके (सरपंच, ग्रामपंचायत लक्ष्मी-टाकळी), संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर शेडगे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तंटक एन.एन.,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवीण ताठे, लक्ष्मी-टाकळी चे ग्रामपंचायत सदस्य सागर भैया सोनवणे, नंदकुमार वाघमारे, महादेव पवार, सागर कारंडे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.तंटक एन.एन. हे होते.
सदर शिबीर सात दिवसीय असुन शिबिराचा प्रमुख विषय हा “युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास" असा असुन या शिबिराद्वारे नवीन मतदार नोंदणी,बालविवाह प्रथा बंद करणे,आजचा युवक व ग्राम-शहर विकास,योग काळाची गरज,वृक्षारोपण,ग्रामस्वछता,इत्यादी विविध विषयांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येईल. (College shram sanskar shibir at Lakshmi Takli) तसेच दररोज तज्ञ व्यक्तींकडून वरील सर्व विषयाचे महत्व व सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तंटक एन.एन. यांनी विद्यार्थ्यांना 'नॉट मी बट यु 'असे सांगुन आपण सर्वांनी राष्ट्राप्रती प्रेम भावना जोपासली पाहिजे असे सांगितले.सदर शिबिरामध्ये ग्राम स्वछता,व्यसनमुक्ती,गावातील विवीध समस्या, जनजागृती, इत्यादी विषयांवर प्रामुख्याने प्रबोधन करावयास सांगितले व सदर सात दिवसीय शिबीरास शुभेच्छा दिल्या. सदर शिबिर आयोजन करण्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम (नाना) निकम व संचालक डॉ.लक्ष्मीकांत निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.कुलकर्णी बी.पी.यांनी केले तर आभार प्रदर्शन बी.सी.ए. विभागप्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रवीण ताठे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा