भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने तब्बल ३० जणांना चिरडले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुण्याच्या नवले पुलावर काल रात्री अत्यंत विचित्र असा अपघात झाला आणि याची चर्चा राज्यभर सुरु असतनाच बिहारमधून एक मोठी बातमी आली आहे. . एक भरधाव ट्रकनं तब्बल ३० जणांना चिरडलं असून यात १५ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील मेहनार गावात हा भीषण अपघात घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूर-महानर मुख्य रस्त्यावरील देसरी पोलीस स्टेशन हद्दीतील नयागाव टोलजवळ हा अपघात झाला. नजीकच्या ब्रह्मस्थान येथे भुईं बाबाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित ट्रकने अनेकांना चिरडले आणि नंतर ट्रक एका झाडावर आदळला. या ट्रकचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता असे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर एकच खळबळ माजली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेले, ज्यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये सहा ते आठ वयोगटातील मुलांचाही समावेश आहे.या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलं की, बिहारमधील रस्ते अपघातात लहान मुलांसह अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी प्रार्थना करते
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की - बिहारमधील वैशाली येथे झालेला अपघात दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत. PMNRF कडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना पन्नास हजार रुपये देण्यात येईल. मोठ्या दुर्घटनेमुळे शोक व्यक्त होत असतानाच या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा