जागर न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनतेला दिलासा मिळाला असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा चिंता वाढवली असून कोरोनाची आणखी एक लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दोन अडीच वर्षे संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने वेठीला धरले होते. जागतिक महामारीने प्रचंड नुकसान तर केले असून कोरोना म्हटले की आता धसका बसू लागला आहे. तरुणांपासून वृद्धापर्यंतचे बळी या महामारीने घेतले असून अर्थचक्र तर ठप्प करून ठेवले आहे. कोरोनाच प्रभाव आता कमी झाला असला तरी झालेल्या नुकसानीतून पूर्वपदावर येण्यासाठी आणखी बराच काळ लागणार आहे. एकामागून एक अशा तीन लाटा येवून गेल्या. आता कुठे मोकळा श्वास घेण्याची वेळ आली आहे तोच आणखी एका लाटेची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
गेली दोन वर्ष जगभरात धुमाकूळ घातलेला कोरोना आता काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतातही कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, अशातच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी सांगितलं की, SARS-CoV-2 विषाणूच्या Omicron प्रकाराच्या XBB उप-प्रकारामुळे काही देशांमध्ये कोरोना संसर्गाची आणखी एक लाट येऊ शकते.
पुण्यात विकसनशील देश लस उत्पादक नेटवर्क (DCVMN) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की आतापर्यंत कोणत्याही देशाकडून असा कोणताही डेटा प्राप्त झालेला नाही, ज्यावरून असं दिसून येतं की संसर्गाचा हा नवीन प्रकार अधिक गंभीर आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितलं की, “Omicron चे तीनशेपेक्षा अधिक उप-प्रकार आहेत. मला वाटतं सध्या चिंतेची बाब म्हणजे XBB, जो एक रीकॉम्बिनंट व्हायरस आहे. आम्ही याआधी काही रीकॉम्बिनंट व्हायरस पाहिले आहेत. ज्याच्या पुढे रोगप्रतिकारक शक्तीही कमी पडते, याचा अर्थ अँटीबॉडीज देखील त्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे XBB मुळे काही देशांमध्ये संक्रमणाची नवीन लाट आपल्याला हळूहळू दिसू शकते."
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी सांगितलं की, SARS-CoV-2 विषाणूच्या Omicron प्रकाराच्या XBB उप-प्रकारामुळे काही देशांमध्ये कोरोना संसर्गाची आणखी एक लाट येऊ शकते.
म्युटेशनमुळे हा विषाणू अधिक संसर्गजन्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं. याला सामोरे जाण्यासाठी डॉ.स्वामिनाथन यांनी यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आणि देखरेखीचा सल्ला दिला. संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणं सुरू ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. (The possibility of a wave of Corona again) दरम्यान दिल्लीत पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली असून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच सगळे निर्बंध हटविण्यात आले असून जिकडे तिकडे पुन्हा पहिल्यासारखी गर्दी दिसू लागली आहे. सण उत्सवावरील निर्बंध देखील हटविले गेले असून लोक आता कोरोना व्हायरसला विसरून गेले आहेत. जनजीवन पूर्वपदावर येत असताना आणि सणासुदीचे दिवस सुरु असतानाच पुन्हा चिंता वाढविणारी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा