जागर न्यूज : तब्बल ४५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले असून एका सहाय्यक अभियंत्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे त्यामुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
महसूल, पोलीस विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले जात असल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. गेल्या काही काळापासून महावितरण अधिकारी, कर्मचारी देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले जात असल्याने दिसून येवू लागले आहे. भलेमोठे पगार असताना देखील फुकटच्या पैशाला चटावलेले बोके अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात तरी देखील लाचखोरीचे प्रकार घडताना दिसून येत असतात. सांगली जिल्हाय्तील पलूस येथे झालेल्या सापळा कारवाईत उप कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी अडकला आहे.
सांगली (जिल्ह्यातील पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तक्रारदार यांच्या कंपनीने सादर केलेल्या सोलर इन्स्टॉलेशनची फाईल मंजूर करण्याकरिता उपकार्यकारी अभियंता अतुल श्रीरंग पेठकर यांना ४५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता सागर विलास चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी पलूस येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात सोलर इन्स्टॉलेशनची फाईल सादर केली होती. ती फाईल मंजूर करण्यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पेठकर व सहाय्यक अभियंता सागर चव्हाण यांनी संबंधिताला ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. (Mahavitaran officer caught red-handed while accepting bribe)ही लाच देणे त्यांना मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे दिसून आले त्यानंतर पेठकर व चव्हाण यांच्यावर एसीबीनं सापळा रचला. यावेळी पेठकर व चव्हाण यांनी तक्रारदाराला ४५ हजार रुपयांचे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधिताला पैसे घेऊन पेठकर व चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आले. पेठकर यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी करून ४५ हजार रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याप्रकरणी सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महावितरण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा