जागर न्यूज :समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय ८२ होते. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते 'नेताजी' या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे कुटुंबिय त्यांना तीन महिन्यांपूर्वीच मेदांता रुग्णालयात घेवून आले होते. मेदांता रुग्णालयात पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती 2 ऑक्टोबरला सकाळपर्यंत ठीक होती. मात्र, त्याचदिवशी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होते.
५५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. १९६७ मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. १९९६ मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.
पक्षाची स्थापना
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी झाला.भावांमध्ये मुलायम सिंह हे तिसरे अपत्य होते. मुलायम सिंह यांनी आपल्या करिअरची सुरुवात कुस्तीपासून केली होती. ते व्यवसायाने शिक्षक होते. काही काळ इंटर कॉलेजमध्ये अध्यापन केले. त्यांच्या वडिलांना त्यांना पैलवान बनवायचे होते. त्यानंतर त्यांचे राजकीय गुरु नाथू मुलायम सिंह यांच्यावर प्रभाव टाकला आणि मुलायमसिंह यादव जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले. १९८२-१९८५ पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते.
पहिल्यांदा आमदार
१९६७ मध्ये मुलायम सिंह पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर ५ डिसेंबर १९८९ रोजी ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुलायम यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी समाजवादी पक्ष, प्रजा सोशालिस्ट पार्टी पुढे नेली. १९६७, १९७४, १९७७, १९८५, १९८९ मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. मुलायम सिंह १९८९, १९९३ आणि २००३ मध्ये यूपीचे मुख्यमंत्री होते. ते लोकसभेचे सदस्यही होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा