जागर न्यूज : अवघ्या चार महिन्याच्या चिमुकल्या मुलीच्या अन्ननलिकेत तब्बल सहा दगड अडकले असल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून लहान मुलांची काळजी घेणे हे किती आवश्यक आहे हेच या घटनेने अधोरेखित झाले आहे.
आई आपल्या कामाच्या व्यापात लहान मुलांकडे लक्ष देत नसल्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. बाळांच्या समोर काही तरी टाकून त्याला नादी लावण्याच्या नादात लहान मुलांच्या घशात खेळण्यातील वस्तू, नाणी अशा वेगवेगळ्या वस्तू अडकून पडल्या असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकाराने बाळांच्या जिवालाही धोका होऊ शकतो. अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता केवळ चार महिन्याच्या चिमुकल्या मुलीच्या घशात अन्ननलिकेत तब्बल सहा दगड असल्याची धक्कादायक बाब तपासणीत समोर आली आहे. एवढ्याशा बाळावर शस्त्रक्रिया करून हे सहा दगड बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात येत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्थ भागातील लटोरी या गावातील आहे. जेव्हा या मुलीचे एक्सरे आणि सीटी स्कॅन केलं गेलं तेव्हा मोठी खळबळ उडाली. गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयातील डॉ. विकास जैन यांनी त्या मुलीचं ऑपरेशन करत अन्ननलिकेत अडकलेले ६ दगड ऑपरेशन करत बाहेर काढले. आता या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. चार महिन्याच्या या चिमुकलीला खोकला येत होता. त्यामुळे पालकांनी तिला गावाकडील उपचार म्हणून खेकड्याचा ज्युस पिण्यासाठी दिला. त्यानंतरही त्या चिमुकलीचा खोकला थांबला नाही. ती सतत रडत असल्याने पालकांनी तिला गोंदिया येथील डॉक्टरांना दाखविले. त्यानंतर डॉक्टरांनी तिचे एक्सरे काढले. यामध्ये अन्ननलिकेत काहीतरी अडकल्याचं दिसून आलं.
डॉक्टरांनी त्या चिमुकलीचं सिटी स्कॅन केलं. तेव्हा समजलं की मुलीच्या अन्ननलिकेत दगड अडकले आहेत. डॉ. विकास जैन यांनी ऑपरेशन करत त्या मुलीच्या अन्ननलिकेत अडकले सगळे ६ दगड काढले आहेत. यानंतर आता या मुलीची स्थिती स्थिर आहे. चिमुकलीचं ऑपरेशन दीड तासात पूर्ण झालं असून त्या मुलीचे पालक गरीब कुटुंबातील असल्याने डॉ. विकास जैन यांनी ऑपरेशनचे पैसेही घेतले नाही. (As many as six stones in the esophagus of a little girl) यामुळे मुलीच्या पालकांना फक्त औषधांचा खर्च करावा लागला. मात्र एवढ्या लहान मुलीच्या अन्ननलिकेत हे दगड गेले कसे? हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. बाळाची काळजी मात्र काळजीनेच घेणे किती आवश्यक आहे हे मात्र या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा