जागर न्यूज : यावर्षी अखेरच्या दिवसांपर्यंत पावसाने हजेरी लावली असून त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात थंडीचा कडका एकदम वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत हवामान विभागाने दिले आहेत
प्रशांत महासागरासह हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान थंड झाले आहे. त्याचा परिणाम देशभरातील थंडीवर होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब-ुवारीदरम्यान संपूर्ण देशासह राज्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले.देशात यंदा मान्सूनचा मुक्काम सुमारे एक महिन्याने वाढल्याने अंतिम टप्प्यात अतिमुसळधार पाऊस झाला. त्यामुळे थंडीचा हंगामही वाढून कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका वेबिनारमध्ये बोलताना व्यक्त केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर ते फेब-ुवारी या हिवाळ्याच्या कालावधीत थंडीची तीव-ता वाढणार आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही अशीच स्थिती सध्याच्या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान प्रशांत महासागर व हिंदी महासागराच्या परिस्थितीवर अवलंबून असते. सध्या या दोन्ही महासागरांतील पृष्ठभागाचे तापमान थंड होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचे संकेत दिले आहेत. अशीच स्थिती बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातदेखील दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील, असे संकेत आहेत.
प्रशांत महासागरातील 'ला-निना' परिस्थितीमुळे या हंगामात हिवाळा अधिक थंड होऊ शकतो, असे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. 'ला-निना'ची स्थिती कमकुवत असल्याने यावर्षी अधिक थंडी पडण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. 'ला-निना'ची परिस्थिती शीतलहरींसाठी अनुकूल आहे, तर 'एल-निनो'ची परिस्थिती प्रतिकूल आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये थंडीच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. गेल्यावर्षी थंडीच्या मोसमात थंडीच्या लाटा लांबल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा