जागर न्यूज : आपले लग्न करून दिले जात नाही म्हणून वैतागलेल्या भावाने आपल्या बहिणीवरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोलापूर येथे घडली असून या प्रकरणी भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लग्नासाठी उतावीळ झालेले तरुण कधी काय करतील हे सांगता येत नाही. आपले लग्न करून दिले जात नाही त्यामुळे समीर शेख नावाचा तरुण अस्वस्थ होता आणि तो यासाठी आपल्या कुटुंबात भांडण करीत होता. त्यानेच लग्नासाठी हे कृत्य केले असल्याची फिर्याद शबाना रफिक हेब्बाळ यांनी दिली आहे. सोलापुरात जुना विडी घरकुल परिसरात ही घटना घडली आहे. भावाने आपल्याच बहिणीला शिवीगाळ करीत तिच्या डोक्यात विळीने वार केल्यामुळे बहिण जखमी झाली आहे. सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शबाना हे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. त्यावेळी फिर्यादीचे वडील आणि त्याचे इतर कुटुंबीय घरात बसलेले असताना आरोपी समीर शेख याने 'माझे लग्न का करून देत नाही'? असा जाब विचारात आपल्या वडिलांना शिवागाळ करू लागला. लग्नासाठी अधीर झालेल्या समीरने आपल्या वडिलाशी देखील असभ्य वर्तन सुरु केले आणि लग्नासाठी घरात गोंधळ घालू लागला. हा पराक्र अधिक वाढू लागल्यामुळे शबाना यांनी मध्यस्ती करत शिवीगाळ करू नको असे म्हटले. बहिण मध्ये पडून आपल्यालाच सांगू लागली याचा त्याला अधिकच राग आला आणि त्याने शबाना यानाही शिवीगाळ सुरु केली. तेवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली
हा प्रकार घरातच सुरु होता आणि वाद वाढू लागला होता त्यामुळे वडील व दुसरी बहीण भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर त्यांना देखील मारहाण करत शिवीगाळ करत दमदाटी केली. यामुळे फिर्यादी यांनी आरोपीला किचनमधून बाहेर काढत असताना आरोपीने फळभाज्या कापण्याच्या विळीने शबाना यांच्या डोक्यात वारा करून त्यांना जखमी केले. (Brother attacked sister for marriage) याबाबत शबाना यांच्या फिर्यादीवरून समीर शेख याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक कांबळे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा