जागर न्यूज : राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप गाजल्यानंतर आता पुन्हा एस टी कर्मचारी उपोषण करणार असून यामुळे परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता दिसून येत आहे.
महामंडळाने अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अजूनही एसटी महामंडळाने या मागण्या मान्य न केल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने १३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने आपल्या विविध २९ प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एसटीची चाके एक गणेशोत्सवात ठप्प होण्याची शक्यता आहे. दरम्यान उपोषण आंदोलनात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी दिले आहेत.
दरम्यान या बेमुदत उपोषणापूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यास न बोलावल्यास १३ पासून राज्य भरात एसटी कामगार संघटने तर्फे उपोषण पुकारले जाणार आहे. आंदोलनात सामील होणाऱ्या चालक व वाहकांवर महामंडळाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसण्यापासून प्ररावृत्त करण्यासाठी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना भेटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षां एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. (State transport employees will go on hunger strike) त्यावेळी जवळपास ३ महिने आंदोलन चालले होते. या दरम्यान काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता तर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा