बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या अन्य योजना देखील अडचणीत आल्या असून 80 गावांची शिरभावी पाणीपुरवठा, कासेगाव पाणीपुरवठा या योजनाही भीमा नदीतील पाण्याअभावी बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.यंदा सोलापूर जिल्हा आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला आहे. मागील 30 दिवसांत पंढरपूर शहर आणि तालुका पावसाअभावी कोरडा गेला आहे. त्याचबरोबर सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने भीमा नदीतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. पंढरपूर तालुक्यातील ओढे, नाले कोरडे पडले आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे आणि भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती ओढवली असूनही प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसते आहे. पावसाचा अंदाज आणि पाणीसाठा याचा ताळमेळ प्रशासनाला घालता आला नसल्याचे चित्र सध्या पंढरपूरमध्ये दिसून येत आहे.
उजनी डाव्या कालव्यातून पाणी सोडले, तर ते पाणी लवकर भीमा नदीत पोहोचेल, असा दावा पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून केला जात आहे. कोणत्याही मार्गे पाणी सोडण्याची गरज आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या 1 लाखाहून अधिक आहे, शिवाय सांगोला तालुक्यातील 80 गावांच्या पाणीपुरवठा योजना, कासेगाव योजना भीमाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन उजनी धरणातून तातडीने पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे.
उजनी धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांचा प्रस्ताव आल्यानंतर कालवा सल्लागार समितीमध्ये प्रस्ताव ठेवून वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाईल. - असेउजनी लाभक्षेत्र प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले आहे, (Bhima river dry, water crisis more acute) त्यामुळे हा सगळा प्रवास होईपर्यंत पंढरपूर बंधारा खडखडीत होईल आणि पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या सुरु होईल असे चित्र दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा