जागर न्यूज : राज्याच्या राजकारणात कितीही बेबनाव असला तरी, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी फोडणारे भाजपचे नेते तथा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी सोलापूर जिल्ह्यात एकत्र येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सांगोल्यात स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठी रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याच कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे रविवारी रोजी स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांचे महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या स्मारकाचे अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यासाठीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आयोजन करण्यात आले आहे.
पुणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानंतर शरद पवार व देवेंद्र फडणवीस सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्मारकाचे वजन 600 किलो असून ते संपूर्ण ब्रांज धातूपासून बनवले आहे. (Sharad Pawar, Fadnavis will come together in Sangola) स्मारकाची उंची साडेआठ फूट असून त्याची उभारणी गजानन सलगर (मिरज) यांनी केली आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, आमदार बबनराव शिंदे.आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अनिल बाबर, आमदार संजय शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, नरसय्या आडम, राजेंद्र देशमुख, दिलीप माने, वैभव नायकवडी, शिवाजीराव काळूंगे, बाबुराव गुरव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा