जागर न्यूज : चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात पंढरपूर तालुक्यातील एक वृद्ध महिला ठार झाली असून पंढरपूर येथील जुना कराड नाका येथील रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवदर्शन आटोपून घराकडे परतताना चालकाचा ताबा सुटून धोकादायक वळणावर रिक्षा उलटून ७५ वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली, तर चार भाविक जखमी झाले. लोटेवाडी- महूद रोडवर सांगोला तालुक्यात अचकदाणी गावाजवळ घडला. या अपघातात पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ७५ वर्षे वयाच्या वृद्ध महिला चांगुणा अर्जुन कदम यांचा मृत्यू झाला आहे. अनिल रामदास माने (रा. करकंब, ता. पंढरपूर) हे आजी चांगुणा, आई मीना, मामा सिद्धू, मावशी नंदा व मावस बहीण लक्ष्मी असे पाचजण मिळून पंढरपूर येथून चालक राहुल हनुमंत पवार (रा. जुना कराड नाका, पंढरपूर) यांच्या रिक्षातून (क्र. एमएच १३ सीटी ४२०४) लोटेवाडी (ता. सांगोला) येथील म्हसोबाच्या देवदर्शनासाठी गेले होते..
देवदर्शन आटोपून हे भाविक परतत असताना आचकदाणीजवळ धोकादायक वळणावर ताबा सुटून रिक्षा रोडच्या खाली पलटी झाली.अपघातात चांगुणा यांच्या डोक्यास मार लागून जागीच मरण पावल्या. अपघातात चौघे जखमी झाले असून, (Elderly woman dies in rickshaw accident) रिक्षाचालक राहुल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षातून दूर अंतरावरील प्रवास धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा