जागर न्यूज : शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना सरकारी दाखले मिळण्यास नेहमीच दिरंगाई होत असते पण आता सोलापूर जिल्ह्यात एका महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून हवे ते दाखले पटापट मिळण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
'सरकारी काम आणि सहा महिने थांब' असा अनुभव नेहमीचाच आहे, वेळीच दाखले मिळत नसल्याने अनेक कामे रखडली जातात तर काही कामे होतच नाहीत. सरकारी यंत्रणेकडून होणारा विलंब हा अनेकांच्या अडचणीचा ठरत असतो परंतु आता कुठलेही सरकारी दाखले जागेवर मिळणार आहेत. 'शासन आपल्या दारी' व महाराजस्व अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसह लाभार्थींना जागेवरच दाखले मिळावेत म्हणून पुढील १५ दिवसांत जिल्हाभर महाशिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी त्यासंदर्भातील कृती आराखडा तयार केला आहे. महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपरिषद व नगर पंचायत, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास, आरोग्य, प्रादेशिक परिवहन विभाग यासह अन्य विभागांचे अधिकारी या शिबिरांमध्ये सहभागी होतील.
या विभागांकडून उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन किमीलेअर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखला (महाराष्ट्र राज्य व केंद्रीय दाखला), नवीन व दुबार शिधापत्रिका, नवमतदार नोंदणी, इमारत बांधकाम व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी निवड, फेरफार देणे, आधारकार्ड अपग्रेडशन करणे, महिलांना शिलाई यंत्र वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, (Government certificates will now be available on the spot, organizing the camp)महिला सखी किट वाटप, मुलींना सायकल वाटप, घरकुल योजना, सीमांत शेतकरी गट बांधणे, कृषी अभियांत्रिकी, शेती व बाजार किट, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ, कृषी सेवा केंद्राचे परवाने, गायी, म्हशी, शेळी, मेंढी वाटप, आयुष्यमान कार्ड, विवाहनोंदणी, शिकाऊ चालक परवाना व इतर सर्व विभागांच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना दिला जाणार आहे.
तालुकानिहाय कॅम्प आयोजित करण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
- उत्तर सोलापूर (नॉर्थ कोर्ट प्रशाला, सोलापूर) २६ मेपर्यंत
- बार्शी (तहसील बार्शी महसूल मंडळ) २२ ते २६ मेपर्यंत
- दक्षिण सोलापूर (मुस्ती) २ जून तर मंद्रुप (जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा) २६ मे रोजी
- अक्कलकोट (अक्कलकोट, चपळगाव, कुरनूर, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, नागपूर, करजगी, तडवळ) २२ ते ३१ मेपर्यंत
- पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ६ जून रोजी तर मोहोळमधील ९ महसूल मंडळांमध्ये २६ ते ३० मे रोजी कॅम्प
- मंगळवेढा (मंगळवेढा) २१ ते २६ रोजी तर माळशिरसमध्ये (पंचायत समिती सभागृह) २५ ते २७ मेपर्यंत
- माढा (पंचायत समिती सभागृह कुर्डुवाडी) १० महसूल मंडळ स्तरावर २३ ते ३१ मेपर्यंत
- करमाळा तालुक्यातील ११ महसूल मंडळांमध्ये २१ ते २६ मेपर्यंत तर सांगोल्यातील बचत भवन, पंचायत समितीमध्ये २६ मे रोजी कॅम्प. याप्रमाणे वेळापत्रक असून गरजू नागरिकांनी आपल्याला अपेक्षित दाखले प्राप्त करून घेण्याची ही एक चांगली संधी आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा