जागर न्यूज : कार्यकर्त्यांचा तपास नसलेल्याना स्वंयंघोषित पुढाऱ्यांना नेता होण्याची घाई झाली असल्यामुळे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लादण्यात आली असल्याची प्रखर टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरु झाली असून, परस्परांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. ही निवडणूक अविरोध होईल असे वाटत असतानाच अखेरच्या क्षणी बिगुल वाजला आणि रणधुमाळी सुरु झाली. विठ्ठल सहकार साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि परिचारक गट यांच्यात सरळ सामना रंगू लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता या निवडणुकीतही आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी अशी परिचारक यांची इच्छा होती परंतु काहींच्या हटवादी भूमिकेने हे शक्य झाले नाही. यावरच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रहार केले आहेत. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी कुणाचे नाव न घेता जहरी टीका केली आहे.
जगाच्या बाजारपेठेत आपला माल जावा, शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळावे त्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.मात्र, आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे १९ कोटी रुपयांचे डिपॉझिट आहे. सर्व काही व्यवस्थित असताना तालुक्यात काही स्वयंघोषित पुढाऱ्यांना तालुक्याचा नेता होण्याची घाई झाली आहे. म्हणून ऊठसूट निवडणूक आली की विरोधाला विरोध म्हणून चांगल्या चाललेल्या संस्थांवर निवडणूक लादण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, या निवडणुकीनंतर कोण कुठं आहे हे कळेल, असे प्रशांत परिचारक यावेळी म्हणाले आहेत. पंढरपूर क्रुषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक विनविरोध यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केला. प्रसंगी तडजोडीची भूमिका आम्ही घेतली. मात्र, काही लोकांना निवडणूक लढवली की तालुक्याचा नेता होता येते असे वाटायला लागले आहे. परिचारकांना विरोध करायचा म्हणून पंढरपूर बाजार समितीचे निवडणूक लावली गेली असल्याचे मत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ गादेगाव येथे आयोजित सभेत परिचारक बोलत होते. यादेळी प्रणव परिचारक, माजी सभापती भगवान चौगुले, वामनराव माने, दिलीप घाडगे, दाजी भुसनर पाटील, विष्णू रेडे, पांडुरंगवे माजी चेअरमन दिनकर मोरे, व्हा. चेअरमन कैलास खुळे, उद्योजक युपी. बागल, माजी सरपंच व उमेदवार महादेव बागल, भीमराव फाटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, यांच्यासह सर्व उमेदवार, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा