जागर न्यूज : कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली असून काही मंदिरात आता मास्क वापरण्याची सक्ती करण्यात येऊ लागली आहे तर पंढरपूर विठ्ठल मंदीराबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
जनजीवन अस्ताव्यस्त करुन टाकलेल्या कोरोनाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आल्याने मोठा दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा या कोरोनाने धडकी भरवली आहे. केंद्र आणि राज्य शासन पुन्हा अलर्ट मोडवर असून केंद्र सरकारने राज्याना मार्गदर्शक सूचना दिल्या असून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील काही महत्वाच्या मंदिरात मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे तर उर्वरित मंदिरेही असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. चीनमध्ये कोरोना हाहाकर माजवला असताना केंद्र सरकारही कोरोनाबाबत सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकाराना नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.विमानतळावरही प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक महाराष्ट्रातील मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील मंदिर प्रशासनांनी मास्कबाबत नियमावली बनवण्यास सुरुवात केली आहे.
परदेशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीनंतर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाने केलं आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही.महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी मास्कबाबत निर्णय होऊ शकतो. मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. (The compulsion of 'mask' started in the temple) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानाने गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा