जागर न्यूज : दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याची चर्चा सुरु असतानाच तब्बल ८ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडण्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
नकली नोटांचा उपद्रव कायम चलनात दिसून येतोच पण गेल्या काही दिवसांपासून नकली नोटांची चर्चाही जोरात सुरु आहे. त्यातच दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात कमी आढळून येत असल्याबाबत देखील अर्थतज्ञ मंडळी चिंता व्यक्त करीत आहेत. काळा पैसा बाहेर काढण्याचे कारण दाखवत शासनाने नोटाबंदी केली आणि दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आणली. दोन हजार रुपयांची नोट आल्याने तेंव्हापासूनच अनेकांनी काळजी व्यक्त केली होती आणि काळा पैसा लपविण्यासाठी या नोटेचा वापर होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला होता. आता चलनात दोन हजार रुपयांची नोट ही दुर्मिळ झाली असून काळा पैसा साठविण्यासाठी तिचा वापर झाला असल्याची चर्चा होत आहे. अशातच थोडेथोडके नव्हे तर तब्बल ८ कोटी रुपयांचे बनावट चलन सापडले आहे.
ठाण्यामध्ये तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय आहे.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली भागात कोट्यवधींच्या बनावट नोटा जप्त केल्या. या नोटा भारता बाहेरुन आल्याचा संशय पोलिसांना आहे. मिरारोड जवळ एका इनोव्हा कारमध्ये (एच ०४ डीबी ५४११) बनावट नोटा आणल्या जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती.त्यानुसार, पोलिसांनी माऊली स्नॅक्स कॉर्नर, गायमुख चौपाटी घोडबंदर रइथं सापळा रचण्यात आला. यावेळी राम रही शर्मा (वय ५२) राजेंद्र रघुनाथ राऊत (वय ५८) या दोघांना इनोव्हा गाडीसह ताब्यात घेतले.
कारमध्ये पाठीमागच्या शिटखाली ४ खाकी पुढ्याचे बॉक्स ठेवलेले होते. कते उघडून पाहिले असता दोन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या आहेत.या नोटांची किंमत ८ कोटी रुपये आहे. या बनावट नोटा वेगवेगळ्या नंबरच्या होत्या, त्या चलनात आणण्याचा दोघांचा डाव होता. (Fake notes worth around eight crores were found) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नोटा कुठून आल्या, इतक्या मोठ्या संख्येनं या नोटांची छपाई कुठे झाली, कुणाला त्या दिल्या जाणार होत्या, याचा तपास पोलीस करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा