जागर न्यूज : अवकाळी पावसाने राज्यात भलताच धिंगाणा घातला असताना पुन्हा आज सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागात वेगवान वाऱ्यासह पाउस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासांत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात तर पुढील 4 दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. मात्र, पावसाची फारशी शक्यता नाही. तापमानात हळूहळू वाढ होईल. शनिवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.'महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून आज मुंबई, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी इथं काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
या अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशामध्ये कमाल तापमान 38-40°C च्या श्रेणीत आहे. तर वायव्य भारत, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तापमान सामान्यपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसनं कमी होतं.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये तापमानात हळूहळू 2-4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि अंतर्गत भागात विस्तारण्याची शक्यता आहे. ओडिशा वगळता देशातील बहुतांश भाग पूर्वपदावर येतील.
अवकाळी पावसाने ऐन उन्हाळ्यात धुमाकूळ घातला असून शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान तर केलेच आहे, शिवाय वीज कोसळल्याने काही प्राण गेले आहेत. या तडाक्यामळे काही भागात शेळ्या, मेंढ्या देखील मृत्युमुखी पडलेल्या असून आता पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या काळजात धडकी भरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा