जागर न्यूज : ऐन उन्हाळ्यात उजनी धरणाच्याच घशाला कोरड पडली असून चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती आली असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करतांना दिसत आहेत. तीन जिल्ह्यांची आणि शेतीची तहान भागविणारी उजनी आज अत्यंत वाईट अवस्थेत आली आहे.
उजनी धरण १०० टक्के भरूनही पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील शेती धोक्यात येते की काय? अशी शंका येथील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. बँकाचे लाखो रुपयांचे कर्ज काढून दहा किलोमीटरहून अधिक लांबीच्या पाइपलाइन शेतकऱ्यांनी केल्या आहेत. परंतु पाणी पातळी खालावल्याने पाइप, केबल, स्टार्टर, विद्युतपंप आदी उपकरणे वाढवण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. करावा लागत आहे. धरण शंभर टक्के भरूनही मे च्या पहिल्या आठवड्यात शून्य टक्क्यांपर्यंत पाणीपातळी खालावली आहे. म्हणजेच धरण पाणीपातळी मायनसमध्ये गेली आहे. प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे ही वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर येथील मुख्य पीक असलेल्या उसासह लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. शेतमालाचे अस्थिर बाजार भाव, खतांचे वाढलेले दर, नापिकी, नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात आता उजनी जलाशयाची पाणी पातळी वेगाने घटत आहे. त्यामुळे बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.जलवाहिन्या उघड्या पडू लागल्याउजनी जलाशयातील पाणीसाठा मेच्या पहिल्या आठवड्यात शून्य टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरातील नेहमी पाणीसाठा असणारी ठिकाणे आता उघडी पडू लागली असून पाणी पातळी कमी झाल्यामुळे जलवाहिन्याही उघड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या जलवाहिन्या पाणी असलेल्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी पाइप, केबल, विद्युत मोटारी यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी यामुळे आणखीच अडचणीत आला आहे.
उजनी धरणातून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्याचे नियोजन असून त्याचे पहिल्या टप्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. मराठवाड्याला पाणी द्यायच्या आधीच उजनी धरणाची अशी परिस्थिती होत असेल तर भविष्यात उजनी लाभक्षेत्रातील शेती, मत्यव्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होणार आहे. (Due to wrong planning, Ujani Dam went dry in the summer) तर जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम होणार आहे. औद्योगिक वसाहतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे. उजनीच्या या अवस्थेस कोण जबाबदार ? असा सवाल देखील आता विचारला जाऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा